Logo

पंचायत समिती कळवण

जिल्हा परिषद नाशिक, महाराष्ट्र शासन

📞 ०२५९२-२२२XXX
📢 नवीन अपडेट: सन २०२६-२७ ची घरकुल योजना लाभार्थ्यांची यादी जाहीर! | 📢 रब्बी पीक विमा अर्ज भरण्यास मुदतवाढ. | 📢 नवीन घरकुल योजना अर्ज सुरु

सर्व योजना व परिपत्रके

कळवण पंचायत समिती अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या सर्व योजनांची सविस्तर माहिती

मानव विकास योजनेंतर्गत मुलींना सायकल वाटप करणे

केंद्र शासन मानव विकास योजनेंतर्गत इ.8 ली ते 12 वी मध्ये शिक्षण घेतअसलेल्या व 1 कि.मी. ते 5 कि.मी अंतरावरुन पायी येणा-या ग्रामीण भागातील मुलींना सायकल घेणे करीता प्रती विद्यार्थीनी रु.5000/- या प्रमाणे अनुदान सबंधित शाळेच्या मुख्याध्यापक यांचे बँक खात्यावर वर्ग करण्यात येते.

⬇️ PDF डाउनलोड करा

शालेय विद्यार्थी यांना पाठयपुस्तक पुरविणे

शालेय विद्यार्थ्यांना इ.1 ली ते 8 वी मध्ये शिक्षण घेणा-या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पाठयपुस्तके पुरविण्यात येतात.

⬇️ PDF डाउनलोड करा

शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप योजना

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेणा-या शालेय विद्यार्थ्यांना एका शैक्षणिक वर्षात 2 गणवेश व बुट सॉक्स वाटप केले जातात. त्यासाठी शासनाकडून प्रती गणवेश रु.300/- व बुट सॉक्स रु.170/- प्रती विद्यार्थी प्राप्त होते.

⬇️ PDF डाउनलोड करा

सुवर्ण मोहत्सवी शिष्यवृत्ती योजना

इ.1 ली ते 10 वी इयत्तेत शिक्षण घेतअसलेल्या अनु.जमाती प्रर्वगातील विद्यार्थी यांना सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना लागु करणेत आलेली आहे.सदर योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना खालील प्रमाणे लाभ अदा करणेत येत आहे.व सदरची शिष्यवृत्तीची रक्कम ही विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर अदा करणेत येते. 1.इ.1 ली ते 4 थी-रु.100/- प्रती महिना (एकूण 10 महिने) 2.इ.5 वी ते 7 वी-रु.150/- प्रती महिना (एकूण 10 महिने) 3.इ.8 वी ते 10वी -रु.200/- प्रती महिना (एकूण 10 महिने)

⬇️ PDF डाउनलोड करा

इ.1 ली ते 8 वी च्या शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजना

• योजनेची प्रस्तावना :- प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पटनोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी शालेय पोषण आहार केंद्र पुरस्कृत योजना राज्यामध्ये शासन निर्णय पूप्राशा-1095/2134/प्राशि-2 दि. 22 नोव्हेंबर 1995 अन्वये इ. 1 ली ते 5 वी च्या विद्यार्थ्यांना ही योजना सुरु करण्यात आली. तसेच शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग क्र.शापोआ2008/प्रक्र264/प्राशि-4 मंत्रालय मुंबई दि. 08/08/2008 नुसार सदर योजनेचा विस्तार करण्यात येवून सन 2008-09 पासून इ. 6 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सदर योजना सुरु केली. केद्र शासनाने सन 1995-96 मध्ये मध्यान्ह भोजन योजना सुरु केली त्यावेळी योजनेचे स्वरुप हे विद्यार्थ्यांना प्रतिमाह 3 कि.ग्रॅ. मोफत तांदूळ देणे अशा स्वरुपाची होती. त्यानंतर सन 2001 मध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने मध्यान्ह भोजन योजनेमध्ये विद्यार्थ्यांना तांदूळ घरी न देता शिजविलेले अन्न दयावे अशा स्वरुपाचे आदेश दिले. त्यानुसार सन 2002 पासून विद्यार्थ्यांना शाळेतच शिजविलेले अन्न देण्यात येत आहे. इयत्ता 1 ली ते 5 वी च्या विद्यार्थ्यांना 450 उष्मांक (Calories) आणि 12 ग्रॅम प्रथीने (Proteins) युक्त मध्यान्ह भोजन देण्यात येत आहे. इयत्ता 6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना 750 उष्मांक (Calories) आणि 20 ग्रॅम प्रथीने (Proteins) युक्त मध्यान्ह भोजन देण्यात येत आहे. • सदर योजनेचे लाभार्थी : योजनेचे लाभार्थी हे केंद्र, राज्य शासनाच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळा, वस्तीशाळा, महात्मा फुले हमी योजनेची केंद्र, अनुदानित अपंग शाळा येथे शिक्षण घेत असलेले इयत्ता 1 ली ते 8 वी चे विद्यार्थी आहेत. • योजनेची ठळक उद्दीष्टे :  प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण.  प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविणे.  शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविणे.  विद्यार्थ्यांमध्ये समभाव रुजविणे.  आरोग्य आणि स्वच्छतेबातचे महत्व विद्यार्थ्यांमध्ये रुचविणे.  विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड वृद्धींगत करणे.  विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय आणि सामाजिक एकीकरणाची भावना वाढविणे. • योजनेस पात्र शाळा संख्या- जि. प. शाळा – 203 खाजगी माध्य,शाळा संख्या - 27 एकूण शाळा - 230 • योजनेस पात्र लाभार्थी संख्या इ. 1 ली ते 5 वी - 12813 इ. 6 वी ते 8 वी - 5974 एकूण लाभार्थी - 18787 • योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारातील प्रमाण : इ.1ली ते 5 वी प्रतिदिन प्रतिविद्यार्थी इ. 6 वी ते 8 वी प्रतिदिन प्रतिविद्यार्थी तांदूळ 100 ग्रॅम तांदूळ 150 ग्रॅम डाळ/ कडधान्य 20 ग्रॅम डाळ/ कडधान्य 30 ग्रॅम तेल 5 ग्रॅम तेल 7.5 ग्रॅम मसाले व इतर 2 ते 5 ग्रॅम मसाले व इतर 3 ते 7 ग्रॅम भाजीपाला 50 ग्रॅम भाजीपाला 75 ग्रॅम शिजविलेल्या अन्नाचे साधारण वजन 250 ते 275 ग्रॅम शिजविलेल्या अन्नाचे साधारण वजन 375 ते 400 ग्रॅम कॅलरीज 450 कॅलरीज कॅलरीज 700 कॅलरीज प्रथिने 12 ग्रॅम प्रथिने 20 ग्रॅम • शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचा शासन निर्णय दि. 12 जून 2025 अन्वये शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्रतिदिन प्रतिलाभार्थी इंधन भाजीपाला आणि धान्यादी मालाचे सुधारीत दर खालीलप्रमाणे : अ. क्र. वर्गवारी अनुज्ञेय आहार खर्च/ एकूण दर धान्यादी मालाचा खर्च इंधन व भाजीपाला खर्च 1 इ. 1 ली ते 5 वी (प्राथमिक) रु. 6.78/- रु. 4.19/- रु. 2.59/- 2 इ. 6 वी ते 8 वी (उच्च प्राथमिक) रु. 10.17/- रु. 6.29/- रु. 3.88/- • प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे 12 प्रकारच्या पाककृतीच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहारात वैविध्यता आणण्याच्या दृष्टीने उपरोक्त तक्यातील अ.क. 1 ते 10 पाककृती वेगवेगळया दिवसासाठी निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना दोन आठवडयामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देण्यात येतात. सदर पाककृतीचा तपशील पुढीलप्रमाणे पाककृती / मेनू अ. क्र. पहिला आठवडा पाककृतीचे नाव अ. क्र. दुसरा आठवडा पाककृतीचे नाव 1 सोमवार व्हेजिटेबल पुलाव 7 सोमवार चणा पुलाव 2 मंगळवार मसालेभात 8 मंगळवार सोयाबीन पुलाव 3 बुधवार मटार पुलाव 9 बुधवार मसुरी पुलाव 4 गुरुवार मुगडाळ खिचडी 10 गुरुवार मुग शेवगा वरणभात 5 शुक्रवार चवळी खिचडी 11 शुक्रवार मोड आलेल्या मटकीची उसळ 6 शनिवार मसुरी पुलाव 12 शनिवार मसाले भात पाककृतीमधील अ. क्र.11 (अंडा पुलाव) व अ. क्र. 12 (गोड खिचडी/ नाचणी सत्व) या पाककृती पर्यायी स्वरुपात देण्यात येत आहे. केंद्र शासनाने स्नेह भोजनाद्वारे योजनें अंतर्गत लोकसहभाग वाढविण्याच्या सुचना दिल्या आहेत. • मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) यांचे पत्र क्र.शापोआ/2018-19/2306 दि. 17 मे 2018 अन्वये शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळा स्तरावर अन्न शिजविणाऱ्या यंत्रणेचे इंधन भाजीपाला अनुदान दि. 1 एप्रिल 2018 पासून MDM Portal मध्ये शाळांनी भरलेल्या दैनंदिन माहितीच्या आधारे संगणकीय प्रणालीद्वारे देयके तयार करुन जिल्हा स्तरावरुन थेट शाळा व्यवस्थापन समितीच्या बॅक खात्यावर जमा करण्यात येते. कळवण गटाचे माहे डिसेंबर 2025 अखेर इंधन भाजीपाला अनुदान सर्व लाभार्थी शाळांना वर्ग करण्यात आलेले आहे. • माहे डिसेंबर 2025 पर्यंतचे स्वयंपाकी तथा मदतनीस मानधन जिल्हा स्तरावरुन थेट स्वयपांकी मदतनीस यांच्या वयक्तीक खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहे.

⬇️ PDF डाउनलोड करा

📄 रमाई व शबरी घरकुल योजना - नवीन लाभार्थी यादी

कळवण तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांची ग्रामपंचायत निहाय सुधारित यादी.

⬇️ PDF डाउनलोड करा

📄 मुख्यमंत्री ग्राम विकास स्मार्ट योजना २०२६-२७

या योजनेअंतर्गत गावातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना.

⬇️ PDF डाउनलोड करा